मॉडेलनं स्वतःशीच केला विवाह; या कारणामुळे घेतला मोठा निर्णय, नाकारले लग्नाचे प्रस्ताव

अनेकदा नात्यांमध्ये भरपूर अडचणी येत असतात. रिलेशनशिपमध्ये (Relationship) राहणारे लोकही अनेकदा आपल्या पाार्टनरला धोका देताना दिसतात. अशात ज्यांना धोका मिळतो, त्यांचा प्रेमावरील विश्वासच उठतो. असंच काहीसं घडलं एका ब्राझिलियन मॉडेलसोबत (Brazilian Model). पुरुषांनी केलेल्या विश्वाघातामुळे वैतागून तिनं एकट राहण्याचा निर्णय घेतला. नंतर तिला हे जाणवू लागलं की ती एकटीच स्वतःसाठी पुरेशी आहे आणि तिला बाकी कोणाचीही गरज नाही.

Advertisement

यानंतर तिनं एक वेगळाच निर्णय घेतला. – कार पार्किंगसाठी सॉलिड जुगाड! भन्नाट Idea पाहून तुम्हीही चक्रावून जाल ब्राझीलच्या साओ पाओलो येथील 33 वर्षीय मॉडेल क्रिस गॅलरा (Cris Galera Marriage) हिच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा ती आपल्या जुन्या बॉयफ्रेंड्सला वैतागून एकटीच राहू लागली. सुरुवातीला तिला खूप एकटेपणा जाणवू लागला आणि तिला असं वाटलं की आनंदी राहण्याासठी तिला एका पार्टनरची गरज आहे.

मात्र, नंतर तिनं स्वतःला सावरलं आणि निर्णय घेतला की स्वतःसोबतच लग्न करायचं, कारण मला दुसऱ्या कोणाची गरज नाही. क्रिसनं नवरीप्रमाणे नटून चर्चमध्ये स्वतःसोबतच लग्न केलं (Model Married With Herself). सोशल मीडियावर या मॉडेलच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल (Wedding Photos of Model) होत आहेत. क्रिसच्या बोल्ड फोटोला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळते.

मात्र, लग्नानंतर डेली स्टारसोबत बातचीत करताना क्रिसनं आणखी एक मोठा खुलासा केला. तिनं सांगितलं, की जेव्हापासून तिच्या लग्नाची बातमी व्हायरल झाली, तेव्हापासून तिला अनेक मुलांचे मेसेज आले आहेत, या सर्वांना तिच्यासोबत लग्न करायचं आहे. त्यातील एक मेसेज अरबच्या शेख यांचाही आहे. व्याज नाही दिलं म्हणून तालिबानी शिक्षा; विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण मॉडेलनं सांगितलं, की अरबच्या शेखनं (Arab Sheikh) तिला म्हटलं, की तिनं स्वतःला घटस्फोट देऊन त्याच्याशी लग्न (Marriage) करावं. या बदल्यात शेख तिला हुंडा (Dowry) म्हणून 3 कोटी रुपये ऑफर करणार होता. मॉडेलनं या व्यक्तीला उत्तर देत म्हटलं, की ती विकली जाणारी वस्तू नाही आणि त्या व्यक्तीला ओळखत नसताना फक्त पैशासाठी लग्न करणार नाही. मॉडेलनं सांगितलं, की याशिवाय अनेकांनी तिला मेसेज करत स्वतःसोबतच लग्न केल्यानं ट्रोलही केलं.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *