सोलापूरहून नगरमध्ये आलेले पावणेदोन टन गोमांस जप्त

सोलापूर(Solapur)

Advertisement
येथून नगरमध्ये विक्रीसाठी आलेले 1800 किलो गोमांस नगर तालुका पोलिसांनी पकडले असून याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे. नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गाडीसह सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. किरण पांडुरंग कुंभार (वय 21, रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस), गुलाम कुरेशी (वय 25, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) अशी आरोपींची नावे आहेत.

सोलापूर जिल्ह्यातून जनावरांचे मांस विक्रीसाठी नगर येथे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलीस पथकाने चास शिवारात सापळा रचला होता. फलके फार्महाऊसजवळ पिकअप गाडी आली असता पोलिसांनी गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीत दोन लाख 70 हजार रुपयांचे 1800 किलो गोमांस असल्याचे समोर आले. पोलिसांनी चार लाख रुपयांच्या गाडीसह गोमांस जप्त केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, धर्मराज दहिफळे, कैलास इथापे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *