बघा तुमच्या उंचीप्रमाणे तुमचं वजन किती पाहिजे!

आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे, लोक योग्य आहार(proper diet)

Advertisement
घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांचं वजन खूप वाढते किंवा आवश्यकतेनुसार कमी होऊ लागतं. अशा परिस्थितीत लोक त्यांचं वजन नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय करतात.

यामध्ये असे काही लोकं आहेत जे स्वत:चं जास्त वजन आहे असं समजतात आणि वेगवेगळ्या आहारांचं पालन करण्यास सुरवात करतात. यानंतर त्यांचं वनज कमी होतं मात्र ते योग्य नसतं.

तज्ज्ञ काय म्हणतात?

आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी. तज्ज्ञांच्या मते, उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं याबाबत माहिती देणार आहोत.

त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला सरासरी वयानुसार सांगू, कोणाचं वजन किती असावं. यानुसार तुम्ही लठ्ठ किंवा वजन कमी आहे हे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल.

पहा उंचीप्रमाणे वजन किती असावं

  • 4 फूट 10 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 41 ते 52 किलो असावं. यापेक्षा जास्त वजन ओव्हरवेटच्या श्रेणीमध्ये येतं.
  • 5 फूट उंचीच्या व्यक्तीचं सामान्य वजन 44 ते 55.7 किलो दरम्यान असावं. हे निरोगी शरीराचं लक्षण आहे.
  • 5 फूट 2 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं हे वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.
  • 5 फूट 4 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.
  • 5 फूट 6 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 53 ते 67 किलो दरम्यान असलं पाहिजे.
  • 5 फूट 8 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 56 ते 71 किलो दरम्यान असलं पाहिजे
  • 5 फूट 10 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 59 ते 75 किलो दरम्यान असावं.
  • 6 फूट उंच व्यक्तीचं सामान्य वजन 63 ते 80 किलो दरम्यान असावं.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *