आमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आमिर खान आणि किरण राव त्यांच्या घटस्फोटामुळे चांगलेच चर्चेत आले होते. आमिर आणि किरणने लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता.

Advertisement

परिणीती चोप्राचा ‘जलपरी’ अंदाज व्हायरल

आमिर आणि किरण जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्यातली मैत्रीचे नाते कायम आहे आणि ते मुलगा आझादसाठी नेहमीच पालकत्वाची भूमिका बजावत राहतील असे त्यांनी सांगितले आहे. काल दोघांना मुलासोबत एका रेस्टोरंटमधून बाहेर येताना स्पॉट करण्यात आले होते. त्यांच्या या लंच डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अत्यंत रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जने हैदराबादचा केला ‘सूर्यास्त’!

जुलै महिन्यात आमिर आणि किरणने विभक्त होण्याचा निर्णय घेतला, जरी त्यांचा घटस्फोट झाला असला तरी ते प्रोफेशनली एकत्र काम करणार आहेत असे त्यांनी जरी केलेल्या स्टंटमेंटमध्ये स्पष्ट केले होते. नुकताच किरण राव आमिर आणि मुलगा आझादला एका रेस्टोरंटमधून बाहेर येताना स्पॉट केले.या वेळेस त्यानी केजुअल ड्रेस परिधान केल्याचे दिसून येत आहे. तसंच ते मीडियासाठी पोझ देताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात किरण आणि आमिरला लडाखमध्ये त्याच्या आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढाच्या’ शूटिंग संपवून परतले असून त्यांचे शूट दरम्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

SIM CARD घेण्यासाठीचे नियम बदलले, व्यवहार होणार DIGITAL

आमिर आणि किरणने विभक्त होताना एक स्टेटमेंट जारी केले होते. या स्टेटमेंटमध्ये ते म्हणाले, “१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत.

जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू. सिनेमा, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये आम्ही सहयोगी म्हणून काम करत राहू.”

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *