समांथाच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी

entertainment news – दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा आणि पती नागा चैतन्य गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकल्यापासून त्यांचे चाहते ही नाराज झाले आहेत. या सगळ्यात समांथा विषयी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. समांथाचे नाव ‘फेमिनाच्या ४० सर्वश्रेष्ठ महिलां’च्या लिस्टमध्ये आलं आहे. यासाठी एक पोस्ट शेअर करत समांथाने त्यांचे आभार मानले आहे.

Advertisement

LPG कनेक्शन घेणे आता झाले अधिक सोपे

समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत समांथाने त्यांचे आभार मानले. समांथाने Femina’s Fabulous 40 चे ट्वीट रिट्वीट करत समांथाने आभार मानले आहे. “माझ्यासाठी हा खरोखर सन्मान आहे. धन्यवाद,” असे ट्वीट समांथाने केले आहे.

काँग्रेसची विनंती मान्य, भाजपचा मोठा निर्णयआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र

समांथाला तिच्या अभिनयामुळेच नाही तर लोक कल्याणाच्या कामामुळे देखील ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अक्किनेनी हे नागा चैतन्यचे आडनाव काढून टाकल्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर समांथा आणि नागा चैतन्य बऱ्याचवेळा कौटुंबिक न्यायालयात जाऊन वकिलाची भेट घेतली असे म्हटले जात आहेत. मात्र, त्या दोघांनी अजुन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (entertainment news )

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *