चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?

यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 

Advertisement
सुरुवातीचे काही सामने मैदानात उतरला नव्हता. पहिल्या सामन्यात तो कर्णधार रोहित बरोबर संघाबाहेर होता. पण दुसऱ्याच सामन्यात रोहित मैदानात आला खरा पण हार्दीक मात्र मैदानात न आल्याने सारेच चिंतेत होते. त्यानंतर रविवारी (26 सप्टेंबर) आरसीबीविरुद्धच्या (MI vs RCB) सामन्यात तो संघात होता. पण त्याने काहीच खास कामगिरी न केल्याने आता आणखीच नवीन चर्चांना उधाण आलं आहे. आधी तो दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक खेळेल का? ही शंका होती. आतातर त्याचा फॉर्मही खास नसल्याने आणखीच नवीन चर्चांना उधाण आलं आहे.

हार्दीक हा मागील बराच काळ गोलंदाजी करत नव्हता. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात त्याला स्थान देण्यात आलं. ज्यावेळी गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्याला देण्यात आल्या. पण त्याने या दोन्हीमध्ये खास कामगिरी न केल्याने सर्वांचीच निराशा झाली. त्यानंतरही टी-20 विश्वचषकाच्या संघात त्याचं नाव आलं खरं पण आता आयपीएलमध्येही खराब फॉर्म आणि दुखापत यामुळे पंड्याची विश्वतषकातील जागा जाऊ शकते.

पंड्याची जागा घेण्यासाठी ‘लॉर्ड’ सज्ज

हार्दिकच्या जागी भारतीय संघात मुंबईच्या शार्दुल ठाकूरची एन्ट्री होऊ शकते. अष्टपैलू हार्दीकला नेमका सूर गवसत नसल्याने त्याला विश्रांती देऊन सध्या राखीव खेळाडूंत नाव असलेल्या शार्दूलला थेट अंतिम भारतीय संघात स्थान मिळू शकतं. सध्या शार्दुल एकमेव भारतीय संघातील उत्तम वेगवान गोलंदाज आहे जो फलंदाजीही उत्तम करतो.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

टी 20 विश्वचषक

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *