पर्यटनाचे हे 6 फायदे वाचाल तर आजच बॅग पॅक कराल

विश्रांतीसाठी म्हणून सहलीला(On a trip)

Advertisement
गेल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर त्यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही अनेक लाभ मिळू शकतात.तुम्ही घराबाहेर असाल, नव्या शहरात भटकंती करत असाल, नयनरम्य देखावे बघत असाल किंवा मग शहराबाहेर शुद्ध हवेचा आनंद लुटत असाल.तुम्हाला सफर करण्याचं भाग्य लाभलं असेल तर बॅग भरण्यासाठी ही आहेत सहा कारणं…

1. हृदयासाठी आरोग्यदायी

तुम्हाला नवनव्या शहरात किंवा निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करायला आवडत असेल तर तुम्ही दररोज जवळपास 10,000 पावलं प्रवास करता. म्हणजे जवळपास 6.5 किलोमीटर. साधारणपणे दररोज एवढं चालणं उत्तम शारीरिक व्यायाम आहे.

चालण्यासोबतच थोडं स्थलदर्शन किंवा इतर काही कृती केली की तुमचा संपूर्ण शारीरिक व्यायाम झालाच म्हणून समजा.

2. तारुण्य टिकण्यासाठी मदत

ग्लोबल कोअलिएशन ऑफ एजिंग रिपोर्टनुसार ताणामुळे अकाली वृद्धत्व येण्याच्या प्रक्रियेला गती मिळते.

शरीरात स्त्रवणारं कॉर्टिसॉल संप्रेरक म्हणजेच हॉर्मोनमुळे शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते. किडनीच्या कामात अडथळा निर्माण होतो. डोकेदुखी, आतड्याची जळजळ होते. मात्र या संस्थेच्या अहवालानुसार कॉर्टिसॉल नियंत्रित ठेवण्यासाठी पर्यटन एखाद्या इंजेक्शनसारखं काम करतं.

सुदैवाने तणावमुक्तीसाठी मोठीच सुट्टी घेणं गरजेचं नाही.

3. बुद्धी कुशाग्र होते

प्रवास म्हणजे नवनवीन पदार्थ चाखणं, नवीन वातावरण अनुभवणं आणि कदाचित नवीन भाषेचा परिचय होणंसुद्धा… या सर्वांमुळे मेंदू उत्तेजित होतो. त्यामुळेच प्रवास म्हणजे मेंदूला चालना देण्याची उत्तम संधी.

ग्लोबल कोअलिएशन ऑन एजिंग रिपोर्टनुसार स्थानिक संस्कृतीची ओळख आणि वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती करून घेण्याने आपण स्मार्ट तर बनतोच. शिवाय यामुळे स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमरसारखे आजार दूर राहतात.

पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसीन विद्यापीठातले डॉ. पॉल डी. नसबम म्हणतात, “प्रवास एक उत्तम औषध आहे.”

4. सर्जनशीलता वाढवते

“तुम्हाला नवीन कल्पना सुचवायची असेल तर त्याबद्दल विचार करणं थांबवा.” हे वाक्य आहे अमेरिकेतले जाहिरात गुरू जेम्स वेब याँग यांच्या “A Technique for Producing Ideas” या पुस्तकातलं.

याचा अर्थ त्यांच्या जाहिरातींसाठीच्या कल्पना आकाशातून पडतात, असं त्यांना म्हणायचं नाही.

त्यांच्यासमोर येणाऱ्या विषयाचा ते अभ्यास करतात आणि त्यावर काही जुजबी विचारही करून ठेवतात. मात्र काहीतरी भन्नाट कल्पना सुचण्याचा जो क्षण आहे तो नंतर कधीतरी येतो. अशावेळी जेव्हा ते काहीतरी वेगळं करत असतात,

5. उत्पादन क्षमता वाढते

आजच्या काळात कामाच्या ठिकाणी होणारी चिडचिड गंभीर विषय बनला आहे.

ताणामुळे केवळ कर्मचाऱ्यांवरचं ओझ वाढलं आहे, असं नाही. तर ताणाशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणा आणि उत्पादनक्षमता कमी झाल्याने, कर्मचारी आजारी पडण्याचं प्रमाण वाढल्याने, अपघात आणि नुकसान भरपाई या सर्वांमुळे कंपन्यांवरचं ओझंही वाढलं आहे. जगभर हीच परिस्थिती आहे.

6. वैयक्तिक विकास साधता येतो

तुम्ही तरुण असाल आणि काही काळ परदेशात राहण्याची संधी तुम्हाला मिळाली तर हा अनुभव तुमच्या वैयक्तिक विकासासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे.

जर्मनीतल्या फ्रिडरक-चिलर विद्यापीठातले डॉ. ज्युलिआ झिमेर्मन आणि डॉ. फ्रान्झ नेयेर यांनी किमान एका सेमिस्टरसाठी परदेशात राहून आलेल्या जर्मन विद्यापीठातल्या तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची परदेशात न गेलेल्या विद्यार्थ्यांशी तुलना केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *