अभिनेत्रीचा पोल डान्स पाहून भल्याभल्यांना फुटला घाम…

सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे अनेक नव्या चेहऱ्यांना मोठ्या सहजतेनं लोकप्रियता मिळत आहे. या चेऱ्यांमध्येच आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. हे नाव आहे एका अभिनेत्रीचं. जिनं जाहिरातीच्या निमित्तानं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला होता. आता हीच अभिनेत्री तिच्या मादक अदांमुळं नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Advertisement

अत्यंत रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जने हैदराबादचा केला ‘सूर्यास्त’!

‘बंटी तेरा साबुन स्लो है क्या’, असं म्हणणारी ही अभिनेत्री आहे, अवनीत कौर. अनेक म्युझिक व्हिडीओजमधून सोशल मीडिया गाजवणारी ही अभिनेत्री प्रत्येक वेळी नव्याच रुपात सर्वांच्या समोर येते. आता म्हणे तिनं एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. या प्रवासाचा पहिला अध्याय तिनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.‘मी या डान्स फॉर्मच्या प्रेमात आहे’, असं कॅप्शन लिहित अवनीतनं पोल डान्सिंगचा पहिल्याच दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला अनेक व्ह्यूज आणि लाईक्सही मिळाले आहेत. मुळात हा डान्स फॉर्म तितकासा सोपा नाही. पण, तरीही तिनं मोठ्या कसबीनं ही कला आत्मसात करण्यासाठी पाऊल उचलल्याचं सर्वजण म्हणत आहेत.

परिणीती चोप्राचा ‘जलपरी’ अंदाज व्हायरल

‘डान्स इंडिया डान्स’ लिटील मास्टर्स या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अवनीतनं इतरही बऱ्याच रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत आपल्या कलेची छाप सोडली. यानंतर तिनं मालिका आणि शॉर्ट फिल्मसकडे आपला मोर्चा वळवला. येत्या काळात ती आणखी कोणत्या नव्य़ा रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *