नशेत करत होते सेक्स, पतीला कळलेच नाही त्याने कधी घेतला पत्नीचा जीव

दारुच्या नशेत तर्राट होऊन सेक्स (Sex) करणे एका पती पत्नीला खूप महागात पडले आहे. पती सेक्स करताना इतका त्यात गुंतला की त्याला समजलेच नाही की त्याने पत्नीचा गळा दाबला आहे. त्याने गळा दाबल्याने पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना इंग्लंडमधील डार्लिंगटन येथे घडली आहे. या प्रकरणी त्याला चार वर्ष आठ महिन्यांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

Advertisement

32 वर्षीय सॅम पायबर याचे 33 वर्षीय सोफी मॉस सोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं देखील होती. फेब्रुवारी महिन्यात सॅम व सोफी यांनी त्यांच्या घरी दारूची पार्टी केली. दोघे मिळून 24 बाटल्या बिअर प्यायले. त्यानंतर ते दोघे सेक्स करत होते. त्यावेळी नशेत असलेल्या पायबसने सोफीचा गळा दाबला. मात्र त्याला समजलेच नाही की सोफी गुदमरतेय. सेक्स झाल्यानंतर तो तिथेच बाजूला झोपून गेला.

 सकाळी जेव्हा त्याला जाग आली सोफी त्याच्या बाजूलाच नग्नावस्थेत पडलेली दिसली. त्याने तिला उठवायचा प्रयत्न केला. मात्र ती उठली नाही. त्यानंतर त्याने इमरजन्सी नंबरला फोन लावला व तिला रुग्णालयात नेले. तिथे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सोफीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनात तिचा गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *