सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटी तर घरगुती उत्सवासाठी 2 फुटी…

मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी अजूनही दररोज रुग्ण आढळत असल्यामुळे पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया नवरात्रोत्सवासाठी(Navratri festival)

Advertisement
पालिकेने ‘कोरोना खबरदारीची नियमावली’ जाहीर केली आहे. यानुसार सार्वजनिक मंडळांच्या उत्सवासाठी 4 फुटी तर घरगुती उत्सवासाठी 2 फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती करू नये, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझेशनसह सर्व प्रकारची कोरोना खबरदारी घ्यावी आणि गरबा-दांडियाचे आयोजन न करता आरोग्य व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याबाबत उपायुक्त हर्षद काळे यांनी परिपत्रक जारी केले आहे.

देशभरात पुढील आठवडय़ात 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार असून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. मात्र यावर्षीच्या उत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना खबरदारी घेऊनच उत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. सार्वजनिक उत्सवासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी ऑनलाईन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाशुल्क देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उत्सवात कोणताही भपकेबाजपणा न करता साधेपणाने उत्सव साजरा करावा असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गर्दी टाळून, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशन याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नियमावली पाळावी अन्यथा साथरोग कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

अशी आहे नियमावली

n सार्वजनिक मंडळांनी मंडप मर्यादित आकाराचे उभारावेत
n आरोग्य, रक्तदान शिबिरे, स्वच्छतेविषयी जनजागृती करा
n मंडपाच्या मुख्य द्वाराचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण
n प्रसाद वाटणे, फुले अर्पण करणे टाळावे
n आगमन-विसर्जनाला दहापेक्षा जास्त जण नसावेत
n मंडप आवारात हार, फुले, प्रसाद विक्री स्टॉल नको
n मंडपात एका वेळी दहा जणांपेक्षा जास्त गर्दी नको
n विसर्जन स्थळी मूर्ती विभाग कार्यालयाकडे जमा कराव्यात
n पंटेंमेंट झोनमधील मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणू नये

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *