इचलकरंजी : मदनलालजी बोहरा हे ऋषितुल्य उद्योगपती – हरीश बोहरा.

अनेक उद्योगांची उभारणी करून इचलकरंजीच्या औद्योगिक विश्वाची भरभराट करणारे श्री. मदनलालजी बोहरा. हे सेवावृत्ती उद्योगपती होते. हजारो हातांना रोजगार मिळवून देणारे शेठजी निरपेक्ष आणि साधेपणाचे जीवन जगले देशभरात अनेक धार्मिक, सामाजिक, आणि शैक्षणिक, संस्थांच्या कार्यात त्यांनी भरीव योगदान दिले.

सुमारे चाळीस वर्षे त्यांनी श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे पालकत्व स्वीकारले होते. या संस्थेच्या भौतिक आणि शैक्षणिक प्रगतीचा त्यांना अखेरपर्यंत ध्यास होता. असे प्रतिपादन श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन. श्री. हरीश बोहरा यांनी केले. येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये आयोजित श्री मदनलालजी बोहरा जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीमान मदनलालजी बोहरा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य श्री. आर. एस. पाटील. यांनी केले प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.एस. गोंदकर यांनी बोहरा शेठजींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या मदनलालजी बोहरा हे पूर्ण ना.बा. परिवाराच्या पितृस्थानी होते. दातृत्व, कर्तुत्व, आणि नेतृत्वाचा, उत्तम संगम त्यांच्यामध्ये होता. त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळवले.

जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी मा. श्री. शेखर शहा सर, सौ. एस. एस. कुलकर्णी, यांनी आपल्या मनोगतातून शेठजींच्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त श्री महेश बांदवलकर, विश्वस्त श्री अहमद मुजावर, श्री कृष्णा बोहरा, पर्यवेक्षक श्री. व्ही. एन. कांबळे सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पर्यवेक्षिका सौ एस. एस. भस्मे, यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जी.एस. भमणगे यांनी केले. सौ रानडे मॅडम यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली..

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *