अंड्यासोबत चुकूनही ‘या’ 5 गोष्टी खाऊ नका…

जगभरात 8 ऑक्टोबर रोजी जागतिक अंडी

Advertisement
दिवस साजरा केला जात आहे. अंड्याचे अनेक फायदे आहेत. लोकं (people first) नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत ते रात्रीच्या जेवणामध्ये अंड खातात. अंड्यापासून खूप प्रकारच्या डिश देखील बनतात. अंड हे प्रथिन्यांनी समृद्ध आहे, अंडी शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास देखील मदत करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण अंड्यासोबत खाणं टाळावं. कारण अशा गोष्टी अंड्यासोबत खाल्ल्याने तुम्हाला अनेक आजारांचा धोका वाढतो.

नराधमाचा तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार…

अंड्यांपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर काही लोक ते पचवण्यासाठी चहा पितात. तज्ज्ञांच्या मते, ही सवय तुमच्या शरीराला हानी पोहोचवण्याचे काम करते. अंडी खाल्ल्यानंतर चहा प्यायल्याने बद्धकोष्ठता होते. ज्यामुळे तुमच्या शरीराचं मोठं नुकसानं होऊ शकतं.

अंड कधीही साखरेबरोबर खाऊ नयेत. जर तुम्ही अंड आणि साखर एकत्र शिजवले, तर दोघांमधून बाहेर पडणारे अमीनो ऍसिड शरीरासाठी विषारी ठरू शकतात. या दोघ्यांच्या एकमेकांत मिसळल्यामुळे, आपल्याला रक्त गोठण्यास समस्या देखील येऊ शकतात.

‘खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं’

उकडलेले अंडे आणि मासे यांचे मिश्रण शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते. म्हणूनच ते कधीही एकत्र खाऊ नयेत. आरोग्य तजंज्ञांच्या मते, हे ऍलर्जीसह अनेक रोगांना जन्म देऊ शकते.

अंड आणि पनीर, दोन्ही प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत, परंतु तुम्ही अंडी आणि पनीर एकत्र किंवा नंतर खाणार नाही याची काळजी घ्या कारण त्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

इंडियन आयडॉल फेम पवनदीप-अरुणिताने गुपचूप उरकलं लग्न? Wedding फोटो होतोय VIRAL…!

सोया दूध शरीरासाठी चांगले आहे. अंडी आणि सोया वेगवेगळ्या प्रकारे शरीरासाठी फायदेशीर आहे. परंतु त्यांना एकत्र खाणे चांगले मानले जात नाही. तज्ज्ञांच्या मते, सोया दुधासोबत अंडी खाल्याने शरीरातील प्रथिनांचे शोषण थांबते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *