इचलकरंजी शहरात “महाराष्ट्र बंद” ला संमिश्र प्रतिसाद

ichalkaranji protest

जय जवान, जय किसान अशा जोरदार घोषणा देत उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शहरात आक्रमक पवित्रा घेतला. लखीमपूर (lakhimpur) हिंसाचार प्रकरणाचा निषेध (protest ) करत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देत शहरातील व्यवहार बंद करण्यात आले.

Advertisement

प्रचंड पोलीस (Police) बंदोबस्तात गांधी पुतळा ते प्रांत छत्रपती शिवाजी पुतळा चौक या मुख्य मार्गावरून जागोजागी निदर्शने करत मोर्चा निघाला बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहराला भेट देवून माहिती घेतली.

“अजित पवार जास्त काळ बाहेर राहणार नाही लवकरच आतमध्ये जातील”

लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व समविचारी पक्ष, संघटनांकडून सोमवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे.गांधी पुतळा चौकात एकत्र जमत मोर्चाला सुरुवात झाली.आधीपासूनच चौकात मोठा पोलीस बंदोबस्त होता.मोदी सरकारचा धिक्कार, केंद्रसरकारच्या धोरणांविरोधी असंतोष मोर्चात दिसून आला.मोर्चा शिवाजी पुतळ्यास वळसा घालून प्रांत कार्यालयावर धडकला.

पोलीस भरतीच्या परीक्षेत ‘हायटेक कॉपी’चा प्रयत्न

मोदी सरकार ब्रिटिशांसारखी वागणूक सर्वसामान्य जनतेला देत आहे.क्रूरपणे केंद्रसरकार जनतेशी वागत असून यापुढे मोदी सरकारची हिटलरशाही खपवून केली जाणार आहे.वेळोवेळी केंद्रसरकारविरोधी आवाज उठवून मोदी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार उपस्थितांनी मनोगतातून व्यक्त केला.मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना दिले. लखीमपूरम घटनेतील गुन्हेगार व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा.याप्रकरणाची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यामुतीच्याकडून करण्यात यावी, अशी मागणी प्रांताकडे केली.

पोलीस भरतीच्या परीक्षेत ‘हायटेक कॉपी’चा प्रयत्न

येत्या आठ दिवसात या घटनेबाबत पुढील कारवाई तात्काळ न झालेस तीव्र आंदोलनाचा (protest ) इशारा महाविकास आघाडी सरकारने दिला. यावेळी नगरसेवक मदन कारंडे, शशांक बावचकर,राहुल खंजिरे, सयाजी चव्हाण, धोंडीबा कुंभार,हनुमंत लोहार, सदा मलाबादे,सुनील बारवाडे, बजरंग लोणारी, शिवाजी साळुंखे, दत्ता माने, मारुती आजगेकर गौस अत्तार आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *