आता मात्र आम्ही मुश्रीफांसोबतच….

hasan mushrif

local politics news – जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बँकेचा कारभार राजकारणविरहित केला आहे. त्यामुळे आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार आहे, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ गट व माजी आमदार संजय घाटगे गटाच्या ठराव धारकांच्या संयुक्त मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. घाटगे अध्यक्षस्थानी होते.

Advertisement

live updates- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान आज कुठे, काय स्थिती आहे?

मुश्रीफ म्हणाले, तालुक्यात एकूण ८३७ ठरावधारक आहेत. त्यापैकी ८०० महाविकास आघाडीचे आहेत. प्रशासकाची सत्ता जाऊन सहा वर्षांपूर्वी बँकेचा कारभार हाती घेतला. त्यावेळी १३७ कोटी संचित तोटा होता. थकीत कर्ज वसुलीचे आव्हान होते. तशाही परिस्थितीत वसुलीसाठी हलगी, ताशा, सनई, चौघडा घेऊन प्रसंगी मित्रमंडळींच्या दारात गेलो.

बँकेचे मालक म्हणून नव्हे, तर विश्वस्त म्हणून कामकाज केले. ते म्हणाले, बँकेची गाडी, नाश्ता, जेवण, हॉटेल भाडे, प्रवास भाडे या कोणत्याही सुविधा घेतल्या नाहीत. माझ्यासह संचालक मंडळातील माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांच्यासह कुणीही या बँकेचा पाच पैशाचासुद्धा लाभ घेतला नाही.

पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि दामदुप्पट परतावा मिळवा

खासदार संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा बँक जिल्ह्याची अस्मिता आहे. स्वर्गीय शामराव भिवाजी पाटील, स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक आणि अलीकडच्या काळात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाने बँकेचा लौकिक वाढविला आहे. हा लौकिक टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.त्यामुळे बॅंक निवडणूक बिनविरोध व्हावी. बँकेच्या निमित्तानेच मंडलिक गट आणि मुश्रीफ गट असा संघर्ष झाला होता; परंतु होऊ घातलेल्या निवडणुकीत कागल तालुक्यातील मंडलिक, मुश्रीफ व घाटगे गट एकत्र येत आहेत. (local politics news)

Flipkart Dussehra Specials सेलला सुरुवात

संजय घाटगे म्हणाले, ‘‘मंत्री हसन मुश्रीफ प्रत्येक परिस्थितीशी सामना करीत संघर्षशील नेतृत्व म्हणून सिद्ध झालेले आहेत. सर्वजण त्यांना पाठबळ देऊया. मंत्रिपदापासून ते गावाच्या एखाद्या ग्रामपंचायत सदस्य व त्याखाली असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखी त्यांची कामाची पद्धत आहे. काही लोकांनी टीआरपी वाढवण्यासाठी आमचा वापर त्यांच्या विरोधात केला; परंतु यापुढे सदैव मुश्रीफ यांच्याच पाठीशी राहायचे ठरविले आहे.

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच यांचा ‘चंदा’

यावेळी चंद्रकांत पाटील, धनराज घाटगे यांचेही मनोगत झाले. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत केले. भैय्या माने यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विकास पाटील यांनी आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *