कोल्हापूरात महिलेचा संशयास्पद मृत्यू…

राजारामपुरी अकरावी गल्ली येथील जितकर कॉम्प्लेक्स (commercial ) मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. शोभा कांबळे (वय 27, रा. रेणुका मंदिराजवळ, राजारामपुरी) असे तिचे नाव आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रथम दर्शनी हा प्रकार संशयास्पद असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदींनी स्वत:चीच पाठ थोपटली

वरिष्ठ पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, भगवान शिंदे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मध्यवर्ती चौकात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांसह बघ्यांची मोठी गर्दी  झाली.भाजपाची १०० दिवसांची रणनीती; जाणून घ्या काय आहे मास्टर प्लॅन

शोभा कांबळे ही महिला अन्य महिला समवेत आयुर्वेदिक उपचार केंद्र चालवतात. आज दुपारी एक वाजता दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून त्या कोसळल्या तीस फूट उंचीवरून खाली पडल्याने (commercial ) डोक्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घात की अपघात यावर परिसरात उलटसुलट चर्चा आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *