खूशखबर! ‘या’ दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये येणार

soybeancrop

सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. परंतू, दिवाळीच्या तोंडावर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस

Advertisement
झाला. त्यामुळे अनेक शेकऱ्यांची पिके(soybean)वाहून गेली. मात्र, शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण पीएम किसान योजनेद्वारे 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तारीख जाहीर झाली आहे. केंद्र सरकार लवकरच संपूर्ण प्रक्रियेसह हप्ता हस्तांतरित करण्यास तयार आहे.

या दिवशी 10 व्या हप्त्याचे पैसे येणार

केंद्र सरकारच्या पीएम किसान सम्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 डिसेंबर 2021 पर्यंत दहावा हप्ता जारी करण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते. त्यानंतर यावर्षीही डिसेंबर महिन्यात रक्कम खात्यावर येऊ शकते.

शरद पवार यांना केंद्राची ऑफर…

योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करा

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्वरित नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येते. या व्यतिरिक्त, तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा स्थानिक तलाठ्यामार्फत अर्ज करू शकता.

…ठरला नऊ वर्षातील इतिहासातला सर्वश्रेष्ठ कर्णधार

नव्या नोंदणीसाठी हे नक्की करा

१. तुम्हाला आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.

२. त्यानंतर फार्मर्स कॉर्नर वर जा.

३. येथे तुम्हाला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

४. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.

५. यासह, कोड टाकून राज्य निवडावे लागेल.

६. फॉर्ममध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

७. यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागेल.

८. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *