सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा..

ऐन सणासुदीच्या(festivals 2021)

Advertisement
काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे महागाई सर्वोच्च शिखराला गाठत असताना पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या दरांनी विक्रमी टप्पा गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं बजेट पुर्णपणे कोलमडून गेलं होतं.

भारतातील किरकोळ महागाई दर म्हणजेच रिटेल इन्फ्लेशन रेट हा 4.35 टक्के करण्यात आला आहे. जो मागच्या 5 महिन्यातील सर्वात कमी असल्याचं पाहायला मिळत आहे. खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या महागाईच्या दरात घट झाल्याने त्याचा परिणाम आता महागाई दरावर होत असल्याचं दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. ऑग्स्ट 2020 च्या तुलनेत या वर्षी ऑगस्ट महिन्यात औद्योगिक विकास दरात तब्बल 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे औद्योगिक विकास दर हा 7 टक्क्यांवरून 11.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दसरा आणि दिवाळी हे वर्षातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक मानले जातात. त्याच्याच पार्श्वभूमीवर महागाईच्या दरात घट झाल्याने सणासुदीत काही प्रमाणात का होईना सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी झळ कमी होणार आहे. भाजीपाल्याच्या महागाई दरात घट झाली असून ती 22.5 टक्क्यांवर आली आहे. महागाई दर हा लाॅजिस्टिक काॅस्ट, उर्जा यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो.

एकीकडे किरकोळ महागाई दरात जरी घट होत असेल तरी खाद्य तेल, मांस,अंडी यांच्या महागाईत मात्र 7 ते 8 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कोअर इन्फ्लेशनचा दर हा सध्या देशात 5.8 टक्क्यांवर आहे. यामध्ये इंधन दर आणि खाद्य पदार्थ यांचा समावेश नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळात महागाईमध्ये कमी अधिक प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *