Breaking – इचलकरंजीत गॅस स्फोटात गंभीर जखमी…

blast

कबनुर (Kabnoor) येथे घरगुती गॅसची गळती (gas cylinder) होऊन त्याचा भडका उडाल्याने अंगणवाडी सेविका गंभीर भाजून जखमी झाल्याची घटना घडली. कांचन स्वामी (Kanchan Swami) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.१३) सकाळी कबनुर येथील दत्तनगर गल्ली नंबर 11 मध्ये घडली.

Advertisement

अनाथ मुलांना EPS अंतर्गत मिळतो लाभ…

जखमी कांचन यांना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मनसे- भाजप युती- त्या भेटीमुळं पुन्हा चर्चेला उधाण

कांचन स्वामी या भाड्याच्या खोलीत राहतात. सकाळी उठून त्यांनी गॅस पेटवला त्यावेळी अचानक भडका उडाला.या आगीत त्या गंभीर जखमी झाल्या. आगीच्या भडक्य़ात (gas cylinder) घर उध्वस्त होऊन घराचे पत्रे परिसरात उडाले.आवाज ऐकून भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

तारक मेहता : साधी अंजली भाभी रिअल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरसत्यांनी तातडीने कांचन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *