आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खाताना या गोष्टींना लांब ठेवाच

आपल्या आतड्यांचे आरोग्य(wellness)

Advertisement
चांगले राखणे ही देखील एक महत्त्वाची  गोष्ट बनली आहे. चांगल्या आरोग्यासाठी काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेकजण सजग झाले आहेत. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला जेवण कसे खावे हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. यूके न्यूज वेबसाइट मेट्रोवरील एका लेखात, पोषण तज्ज्ञ क्लेरिसा लेनहर असे म्हणतात, लोकांना असे वाटते की आतड्यांचे आरोग्य केवळ आपण खाल्लेल्या पदार्थांशी संबंधित आहे. परंतु, आपल्याला हे माहीत असले पाहिजे की, आपण खाण्याची पद्धत देखील त्यासाठी खूप महत्वाची आहे. क्लेरिसा लेनहार पुढे म्हणतात, ‘अनेकांना चालता-चालता अन्न खाण्याची सवय लागली आहे, पण अशा सवयींमुळे अपचन आणि आतड्यांना सूज येणे, अशी लक्षणे दिसू शकतात.

जेव्हा पचनाशी संबंधित समस्या येतात तेव्हा विचार न करता खाणे हे सर्वात मोठे घातक बनते. त्या म्हणतात, ‘आपण जेवताना अनेक वेळा पाचन प्रक्रियेसाठीचे महत्त्वाचे भाग वगळतो, पण जेव्हा आपली पचनसंस्था प्रभावीपणे काम करत असते, तेव्हा आपण आपले अन्न सहज पचवू शकतो आणि खाण्यातून अधिक पोषक तत्त्वे घेऊ शकतो आणि आतड्यांचे चांगले आरोग्य मिळवू शकतो.’ आपण खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करून आतड्यांची कार्यक्षमता कशी सुधारता येईल याबाबत माहिती घेऊया. अन्न चांगले चर्वण करा क्लेरिसा म्हणतात की, पचन यंत्रणा आपल्या तोंडातून सुरू होते. जेव्हा आपण अन्न पदार्थ व्यवस्थित चघळता, तेव्हा आपण लाळ सोडतो, ज्यात पाचक एंजाइम असतात, जे खाल्लेले अन्न पचवण्यास मदत करतात.

ही प्रक्रिया नीट न झाल्यास आतड्याला सूज येणे आणि अपचन होऊ शकते. अन्न तोंडात पूर्ण बारीक होईपर्यंत ते चावले पाहिजे, तोंडातील घास सफरचंद पुरीसारखा बनला पाहिजे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *