…ठरला नऊ वर्षातील इतिहासातला सर्वश्रेष्ठ कर्णधार

grammariancricket

 

गेल्या वर्षी दिल्लीला आयपीएलच्या फायनल

Advertisement
पर्यंत पोहचवण्यात महत्वपूर्ण भूमिका (grammarian)बजावणारा टीमचा कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानंतर आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कॅप्टन पद ऋषभ पंतकडे सोपवण्यात आले.  ऋषभ पंतच्या धमाकेदार बॅटिंगने  दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल जिंकण्याची  अपेक्षा वाढली आहे. आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची पहिली मॅच चेन्नईसोबत झाली.  या सामन्यात ऋषभ पंतने आपल्या कर्णधारपदाचे अप्रतिम कौशल्य दाखवलं. त्यानंतर दिल्लीच्या टीमला त्यांच्या  राजस्थान सोबतच्या समान्यामध्ये हार पत्करावी लागली. पण त्यानंतर ऋषभ पंत कॅप्टन असतानाच दिल्ली कॅपिटल्सने  पंजाब, मुंबई आणि हैदराबाद या संघांना हरवून हॅट्रिक केली.

सुरूवातीच्या 8 सामन्यांपैकी दिल्लीने 6 सामने जिंकून प्लेऑफसाठी दावा मजबूत केला होता. तेव्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले होते. बीसीसीआयने यूएईमध्ये लीगचा दुसरा टप्पा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीचा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत झाला. दिल्लीने हा सामना देखील  जिंकला होता. दिल्ली कॅपिटल्स टीमने 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आणि प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं. 2012 नंतर दिल्लीने आत्तापार्यंत सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सने 2012 मध्ये  11 सामने जिंकले तर 2009 मध्ये  10 सामने जिंकले.

…तर २५ ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर

ऋषभ पंत कर्णधार असतानाच दिल्लीने आत्तापर्यंत सर्वांधिक सामने जिंकले असून गेल्या सिझनमध्ये श्रेयस अय्यर कॅप्टन असताना दिल्ली संघाने 9 सामने जिंकले होते. ऋषभ पंतच्या कॅप्टन्सी अंतर्गत दिल्ली कॅपिटल्सने आत्ता पर्यंतचे सर्वाधिक सामने जिंकले आहेत.

WhatsApp Users साठी Bad News…

आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्येचेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सवर चार विकेट्सनी विजय मिळवला होता. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं नवव्यांदा फायनलमध्ये जागा मिळवली. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चांगलाच निराश झाला होता त्यानं निराशा व्यक्त करताना आम्ही नक्कीच फायनल मध्ये पोहोचू असाही विश्वास व्यक्त केला होता.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *