कंगनाने शेअर केला माधुरी आणि सलमानचा जुना व्हिडीओ, म्हणाली…

bollywood madhuri/salman

बॉलीवूड (bollywood) अभिनेत्री कंगना रनौत तिच्या पोस्टमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ

Advertisement
शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर ९०च्या दशकातील हिट चित्रपट ‘हम आपके है कौन’चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता सलमान खानचं अतिशय लोकप्रिय गाणं दीदी तेरा देवर दिवानाचा आहे.

आपलं घराणं कुठलं, आपण करताय काय? उदयनराजेंवर घराण्यावरून वार

तिने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शेअर करत तिने कॅप्शन लिहिले, ” आह! विंटेज बॉलिवूड,” आणि त्यासोबतच हृदयाच्या चिन्हाचे इमोजी जोडला. व्हिडिओमध्ये सलमान आणि माधुरी हिट गाण्यावर एकत्र नाचताना दिसतं आहेत. १९९४ साली रिलीज झालेला ‘हम आपके हैं कौन’ हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले आहे. गेल्यावर्षी माधुरीने कंगनाच्या अभिनयाचे कौतुक केले होते, कंगना ही एक उत्तम अभिनेत्री आहे, ती कोणतीही भूमिका सहजरित्या साकारु शकते, ” असं माधुरी दीक्षितने एका मुलाखतीत सांगितले.

Kangana Instagram stories

कंगनाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून ती माधुरी दीक्षितची (bollywood) खूप मोठी फॅन आहे असे दिसत आहे. कंगनाने आणि सलमानसोबत ‘सुलतान’ चित्रपटात काम करण्याची संधि होती मात्र तिने नकार दिला होता. कंगनाचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘थलायवी’ या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत हिने जयललिता यांची भूमिका साकारली आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसत आहे.

सत्तेची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत…

ए.एल.विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून शैलेश सिंग आणि विष्णू इंदुरी निर्माते आहेत. जयललिथा यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *