कोल्हापूर – कोरोनाचे नियम पाळून दसरा सोहळा होणारच

golden temple(Rajvada)

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नाममात्र व आटोक्यात असल्याने राज्यातील सर्व देवस्थाने व देवालये(golden temple) सुरू झाली आहेत. त्यामुळे यंदा करवीरचा ऐतिहासिक दसरा सोहळा कोरोनाचे सर्व नियम पाळून शुक्रवारी दसरा चौकात पारंपरिक पद्धतीने होणार असल्याची माहिती शाहू छत्रपती यांनी पत्रकाद्वारे मंगळवारी दिली.

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा..

करवीरचा ऐतिहासिक दसरा सोहळा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र तसेच देशभरातील भाविकांचे करवीरच्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे लक्ष असते. गतवर्षी कोरोनाच्या संकटकाळात ऐतिहासिक दसरा चौकात होणारा दसऱ्याचा सीमोल्लंघनाचा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जुना राजवाडा भवानी मंडप येथे साजरा करण्यात आला होता.

राज्यात काल 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

पारंपरिक दसऱ्यासाठी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी आणि गुरुमहाराज यांच्या पालख्या दसरा चौकात येत असतात. तसेच करवीर छत्रपती घराण्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला जातो. पारंपरिक दसरा हा आपल्या कोल्हापूरच्या संस्कृतीचा, परंपरेचा ऐतिहासिक असा ठेवा आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये दसरा सोहळा हा कोरोनाचे (corona) नियम पाळून सुरक्षित अंतराचे नियम ठेवून होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात येणार आहे, असेही शाहू छत्रपती यांनी म्हटले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *