‘अदिती म्युझिक कंपनी’ रसिकांच्या भेटीला

Aditi Music Logo

झी समूहासारख्या नामांकित माध्यम कंपनीत २० वर्षाहून अधिक काळ काम केल्यानंतर, ‘मनोरंजन क्षेत्रासाठी (music company) काहीतरी वेगळं केलं पाहिजे’ या जाणीवेतून विजय शिंदे यांनी निर्मीतीचे शिवधनुष्य पेलत निर्मात्याची नवी इनिंग सुरु केली आहे. मराठी चित्रपटाच्या यशाचे प्रमाण नेहमीच अपयशी चित्रपटांच्या तुलनेत कमी असते.

Advertisement

तारक मेहता : साधी अंजली भाभी रिअल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस

चित्रपटाच्या अपयशाची अनेक कारणे असतात, त्यापैकी एक म्हणजे निर्मीती व्यवस्थापनाचा योग्य तो समतोल साधता न येणे. चित्रपटाचे निर्मितीमूल्य, तांत्रिक दर्जा जपत ज्या प्रेक्षकांसाठी आपण चित्रपट तयार केला त्यांच्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर अल्पावधीतच एकामागोमाग एक सलग अशा चार चित्रपटांची घोषणा केली.

राज्यातील सिनेमागृहे अन् नाट्यगृहांची घंटा वाजणार..

सोयरीकपोरगं मजेतय,  नाही वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा‘हवाहवाई’ या चार मराठी चित्रपटांच्या माध्यमातून निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले असतानाच आता ‘अदिती म्युझिक कंपनी’ची मुहूर्तमेढ विजय शिंदे यांनी रोवली आहे.

महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांची मराठी संगीताशी एक विशेष नाळ जोडलेली आहे. मराठी संगीत रसिकांच्या या अभिरुचीची दखल घेत दर्जेदार आणि उत्तमोत्तम संगीत कलाकृतींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने विजय शिंदे यांनी आदिती म्युझिक कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ए.एम म्युझिक कंपनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

सलमानच्या वडिलांनी अमिताभ बच्चन यांना सेवानिवृत्त होण्याचा दिला सल्ला…

अदिती म्युझिक कंपनीचा (music company) घटस्थापनेला मुंबईत शुभारंभ होत आहे. गुणी प्रतिभावान कलाकारांना संधी मिळावी यासाठी आमची म्युझिक कंपनी प्रयत्नशील असेल असे ‘अदिती म्युझिक’चे सर्वेसर्वा विजय शिंदे यांनी सांगितले. होतकरू कलाकारांचे उत्तमोत्तम अल्बम श्रोत्यांसमोर आणणे हे आमचे उद्दिष्ट असून यात मराठी भाषेसोबत इतर प्रादेशिक भाषेतील गीतांनासुद्धा स्थान देण्यात येणार आहे.

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पडद्यावर दिसली समंथा

भक्तीगीते, शास्त्रीय, वाद्यसंगीत, गझल आदी अनेक प्रकारचे हे अल्बम असतील.’अदिती म्युझिक कंपनीतर्फे लोकसंगीत, जागर, भक्तीसंगीत, लावणी, गझल यांसारख्या वैविध्यपूर्ण गीत-संगीताची मेजवानी आगामी काळात रसिकांना मिळणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *