सचिन तेंडुलकरची लेक सारावर बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता झाला लट्टू

instagram sara tendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

Advertisement
ची एकुलती एक लाडकी मुलगी सारा तेंडुलकर सध्या खूप चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टला खूप लाइक्स मिळत असतात. असाच एक फोटो तिने नुकताच इंस्टाग्राम(instagram)वर शेअर केला. या फोटोने फक्त चाहत्यांनाच नाही तर एका बॉलिवूड अभिनेत्यालाही भुरळ पाडली आहे.

सारा तेंडुलकर हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बाल्कनीमध्ये उभी दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्माईलने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहे. तिचा हा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्याही पसंतीस पडला आहे. त्यानेही हा फोटो लाईक केला आहे.

दिल्ली आणि कोलकात्यात चुरशीची लढत, कोण पोहोचणार अंतिम सामन्यात?

सारा तेंडुलकरच्या या फोटोवर आलेल्या कार्तिकच्या लाईकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतकेच नव्हे, तर बऱ्याच चर्चांना उधाणही आले आहे. दरम्यान, सारा सध्या मुंबई आणि लंडनमध्ये ये- जा करत असते. मुंबईत तिचे कुटुंब असून, लंडनमध्ये ती वैद्यकिय क्षेत्राचे शिक्षण घेत आहे. मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

कंगनाने शेअर केला माधुरी आणि सलमानचा जुना व्हिडीओ, म्हणाली…

या चर्चांना आलं होतं उधाण

मध्यंतरी ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार अशीदेखील चर्चा होती. काही दिवसांपूर्वी सारा एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. कोलकाताचा दमदार फलंदाज व टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले गेले होते. दोघांनी एकाच वेळी I SPY असे कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. काही महिन्यांपूर्वी गुगल(instagram) या सर्च इंजिनवर शुबमन गिलची पत्नी म्हणून सारा तेंडुलकर हिचे नाव झळकले होते. अर्थात WTC फायनलपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शुबमनने आपण सिंगल असल्याचे सांगून या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला होता.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *