‘सोयरीक’ चित्रपटातील गोंधळाला अजयचा स्वरसाज

Ajay atul music video

सध्या नवरात्रैात्सवाची लगबग सुरु आहे. आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना या दिवसात प्रत्येकजण करीत असतो. गायक संगीतकार अजय गोगावले यांनीसुद्धा यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या आगामी ‘सोयरीक’

Advertisement
या मराठी चित्रपटासाठी त्यांनी हा गोंधळ गायला (music video)  आहे.

नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरावी?

डोई धरीला धरीला आईचा देव्हारा,  भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा

पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला,  तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला

आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा,  येल्लू आईचा उधं उधं…..

असे बोल असणारा हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून संगीतकार विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे. गोंधळाबद्दल बोलताना अजय गोगावले सांगतात की, ‘जोगवा’ नंतर ‘सोयरीक’ चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे.

तारक मेहता : साधी अंजली भाभी रिअल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस

विजयसोबत याआधी काम केल्याने ‘मळवट’ या गोंधळासाठी छान ट्यूनिंग जमलं व हा गोंधळ गातानासुद्धा खूप मजा आली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला आलेल्या ‘अदिती म्युझिक’ कंपनीने या गाण्याचे (music video) हक्क घेतले आहेत.

राज्यातील सिनेमागृहे अन् नाट्यगृहांची घंटा वाजणार..

आपल्यातल्या स्वार्थ अन निस्वार्थाची लढाई यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच मांडायचा प्रयत्न ‘सोयरीक’ चित्रपटात करण्यात आला आहे. मकरंद माने लिखीत दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित ‘सोयरीक’ हा कौटुंबिक धाटणीचा मनोरंजक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *