राज्यात काल 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

कोरोनाबाधितांच्या(coronary artery disease)

Advertisement
दैनंदिन रुग्णसंख्येत चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 616 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 07 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के आहे.

राज्यात काल 43 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 206 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (2), धुळे (7), जालना (35), परभणी (84), हिंगोली (18), नांदेड (12), अकोला (28), वाशिम (05), बुलढाणा (15), यवतमाळ (08), वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), गडचिरोली (14 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यातली रुग्णसंख्या…

राज्यात सध्या 30 हजार 525 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,31,009 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,331 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 04, 20, 515 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,81, 677 (10.89टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या..

मुंबईत गेल्या 24 तासात 425 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,24,821 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5098 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1154 दिवसांवर गेला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *