मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने केलेला खुलासा हास्यास्पद

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीने महापालिका प्रशासकांकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी केलेला खुलासा हा दिशाभूल करणारा व हास्यास्पद असून आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी अशा स्वरूपाचा आहे. असे पत्रक माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी दिले आहे.

Advertisement

“विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास मिळणं हे ‘भाग्य’ आहे”

पत्रकात म्हटले आहे की घोरपडे यांनी २००४ साली दिलेली वटमुखत्यार हे मुळात मर्यादित क्षेत्रापुरते होते. सदर मिळकतीचा फायनल लेआऊट १९८०-१९८१ मध्ये झाला होता. फायनल लेआऊट मंजूर करताना मोजणी खात्यामार्फत मोजणी करून क्षेत्रमेळ केला जातो. त्यावेळी घोरपडे यांनी आपले क्षेत्र कमी झाले आहे किंवा आपल्या क्षेत्राचा मेळ बसत नाही, अशी तक्रार किंवा महानगरपालिकेबरोबर वाद केलेला नाही. तसेच कोणत्याही मंजूर लेआऊटमधील खरेदी घेतलेल्या प्लॉटधारकांचा प्लॉट कमी दिले बाबत तक्रार नाही, यामुळे घोरपडे यांचे क्षेत्र कमी असे म्हणता येणार नाही.

राज्यात काल 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!मुळात घोरपडे यांचे असलेले क्षेत्र हे ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क या आग्नेय दिशेला असताना नव्याने निर्माण करण्यात आलेली कब्जेपट्टी व अतिक्रमित म्हणून दाखवून कब्जेत घेतलेले क्षेत्र ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कच्या वायव्य दिशेला घेण्यात आलेले आहे. घोरपडे यांचे क्षेत्र अतिक्रमित (political news) असते तर ते ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कच्या आग्नेय दिशेला निष्पन्न झाले असते, वायव्य दिशेला नाही.

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा..

यावरूनच मुश्रीफ यांच्या वतीने देण्यात आलेला खुलासा हा केवळ दिशाभूल करणारा आहे. भ्रष्टाचाराचे निवेदन लेटरहेडवर देणे पक्षाची बेअब्रू करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे केवळ मंत्री मुश्रीफ यांना खूश करण्यासाठी माजी महापौर व माजी नगरसेवकांनी केलेली ही लाचारी आहे. यासंदर्भात आता पुढील लढा न्यायालयीन पातळीवर होईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *