Drugs Case: आर्यन खानला ठेवणार सामान्य कैद्यांसोबत

Prison(Aryan Khan)

क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान आणि इतर आरोपींची कोविड चाचणी

Advertisement
बुधवारी रात्री करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आर्यनसह इतर सहा आरोपींना सामान्य कैद्यांसोबत बराकमध्ये हलवण्यात येणार आहे. त्याचसोबत जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, न्यायालय शिक्षा सुनावत नाही, तोपर्यंत आर्यनला घरचे कपडे वापरण्याची परवानगी दिली आहे. मात्र घरच्या जेवणाला परवानगी नाही, त्यामुळे आर्यनला कारागृहा(Prison)तीलच जेवण दिले जाणार आहे. आर्यनने कूपनद्वारे तुरुंगाच्या कॅन्टिनमधून काही बिस्किटचे पॅकेट्स, स्नॅक्स आणि पाण्याच्या बाटल्या घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला आणि इतर आरोपींना कैद्यांप्रमाणेच ब्लँकेट आणि चादर देण्यात आली आहे.

म्हणून शरद पवार यांच्या मनात वेदना; देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका…

आर्यन आणि अरबाज मर्चंट यांना आर्थर रोड कारागृहात क्वारंटाइन करण्यात आले होते. आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यात या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र तरीही कारागृहाच्या नियमांनुसार नवीन आरोपींना सुरुवातीचे काही दिवस (पाच ते सहा) क्वारंटाइन केले जाते. त्यानंतर त्यांची रवानगी इतर कारागृहात केली जाते. आता क्वारंटाइन संपल्यानंतर आर्यन आणि इतर आरोपींना सामान्य कैद्यांसोबत बराकमध्ये हलवण्यात येणार आहे.

भारतात आली ट्रायटनची इव्ही मॉडेल एच…

क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आर्यन खानसह मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट यांना केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) याप्रकरणी पहिल्या दिवशी अटक केली होती. त्या सर्वांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *