म्हणून शरद पवार यांच्या मनात वेदना; देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका…

(goa tourism)Devendra Fadnavis

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Advertisement
  हे सध्या गोव्याच्या(goa tourism) दौऱ्यावर आहेत. त्यांनी गोव्यात  राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. फडणवीसांनी म्हटलं आहे की, पवार साहेब मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना फार उत्तर देता येत नाहीत. मात्र आपण असेही म्हणू शकतो की शरद पवार यांना पंतप्रधान पद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना आहे.  राजकारणात असं बोलावं लागतं, असं ते म्हणाले.

त्यांनी म्हटलं की,  सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे खरे आहे परंतु त्यासाठी आम्ही हात पाय गळून बसलो नाहीत. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही पण याच्या खूप पुढे गेलो.  गेल्या दोन वर्षात मी राज्य पिंजून काढलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे. पूर, वादळ, अतिवृष्टी या काळात आम्ही लोकांमध्ये आहोत.  लोकांचा रोष सरकार बद्दल आहे आणि तो संघटित करण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही जनतेचे लोक आहोत आणि जनतेकरता काम करत आहोत, असं ते म्हणाले. 

भारतात आली ट्रायटनची इव्ही मॉडेल एच…

येणाऱ्या निवडणुका काही मित्रांना सोबत घेऊन लढणार 

आगामी निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की((goa tourism)),  येणाऱ्या निवडणुका आम्ही आमच्या काही मित्रांना सोबत घेऊन लढणार आहोत. आता तरी मनसेबाबत कुठलीही युती झालेली नाही. बाळा नांदगावकर त्यांचे काही वैयक्तिक विषय होते त्यासाठी आले होते, असंही त्यांनी सांगितलं.  फडणवीस यांनी सांगितलं की,  गोव्यात चांगले काम सुरू आहे. गोव्यात आम्हाला विजय मिळेल.  मागच्या वेळी कमी जागा मिळाल्या होत्या. यावेळी पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी तयारी सुरू आहे.

Aishwarya Narkar:’चेहरा है या चाँद खिला है, ज़ुल्फ़ घनेरी शाम है क्या’

या सरकारमध्ये प्रत्येक जण मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकारने यापूर्वी जी मदत घोषित केली होती तरी पोहोचली आहे का? आधी सरकारने त्या मदतीचा आढावा द्यावा.  आकडेवारी फेकायची या पलीकडे हे सरकार काहीही करत नाही.  शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत.  या सरकारमध्ये प्रत्येक जण मुख्यमंत्री आहे जनतेची चिंता कोणालाही नाही.   अनिल देशमुख यांच्याविरोधात कारवाया कोर्टाच्या आदेशानुसार सुरू आहेत.  आयकर विभागाला एक हजार कोटी रुपयांच्या दलालीचे कागदपत्र सापडले आहेत.

एक हजार कोटी रुपयांची दलाली होत असेल तर केंद्र सरकारने काय चुपचाप बसायचं का? असंही ते म्हणाले. हे दलाल कोण आहेत? हे कुणाचे पैसे आहेत? कुठून पैसे येतात? ते कुठे पैसे जातात ? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत.  एकीकडे मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही आणि दुसरीकडे हजारो कोटी रुपयांची दलाली होत आहे हे गंभीर आहे. या सगळ्या दोषींवर कारवाई व्हायला हवी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. महाराष्ट्रात खंडणी वसुलीचे काम सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *