सावरकरांवरून पुन्हा राजकारण….

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून पुन्हा राजकारण(politics)

Advertisement
सुरू झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावरून नवा वाद पेटला आहे. सावरकरांनी महात्मा गांधींच्या सूचनेनुसार ब्रिटिशांकडे सुटकेसाठी अर्ज केला होता, असे राजनाथ यांनी म्हटल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळासह विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या वंशजांमध्येच खडाजंगी उडाली आहे.

शेवटी सत्य मानावे लागले – तुषार गांधी

मी राजनाथ सिंह यांचा फार ऋणी आहे. कारण आम्ही जे कित्येक वर्षांपासून सांगत होतो की, सावरकरांना माफी मागायची सवय होती याची पुष्टी त्यांनी केली.शेवटी त्यांना सत्य मानावे लागले आणि त्यांनी महात्मा गांधींचे समर्थन केले, यासाठीही ऋणी आहे. जेव्हा सावरकरांनी प्रथम माफीनामा दिला तेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह करत होते. त्यांचे लक्ष हिंदुस्थानवर नव्हते. पण त्या वेळीही सावरकरांवर त्यांचा पगडा होता हे सांगण्यासाठीही मी राजनाथ सिंह यांचे आभार मानतो, असे वक्तव्य महात्मा गांधी यांचे वंशज तुषार गांधी यांनी केले आहे.

सावरकरांचे अर्ज गांधीना मान्य – रणजीत सावरकर

राजनाथ सिंह यांनी माफीनामा हा शब्द न वापरता अर्ज हा शब्द वापरला आहे. ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमधील सर्व अर्ज पुस्तकांमधून समोर आणण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटिशांनीसुद्धा मान्य केले आहे की, अर्ज आहेत. गांधीजींचा सल्ला घेणे त्यांना अशक्य होते. पण गांधीजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटका व्हावी यासाठी दोन लेख लिहिले आहेत. सावरकरांनी जे अर्ज केले ते गांधीजींना मान्य होते आणि सावकरांच्या अर्जांना गांधीजींचा पाठिंबा होता, असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे. तसेच महात्मा गांधींना राष्ट्रपिता का म्हणावे, असा सवालही त्यांनी केला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *