मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्वीट; म्हणाले…

pm(Modi)

माजी पंतप्रधान(pm) मनमोहन सिंग

Advertisement
यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांनी तापानंतर थकवा जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या प्रकृती स्थिर आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्यासाठी ट्वीट केलं असूल लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मनमोहन सिंग यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

नवा कायदा लागू करण्याच्या तयारीत सरकार

यावर्षी एप्रिल महिन्यात मनमोहन सिंग यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एम्समध्येच दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. मनमोहन सिंग करोनावर मात करून घरी देखील परतले होते.

मोठी बातमी: रवी शास्त्रीनंतर हा होणार टीम इंडियाचा नवा कोच!

८९ वर्षीय मनमोहन सिंग यांना सोमवारी ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांना बरं वाटू लागलं होतं. मात्र, नंतर त्यांना अशक्त वाटू लागल्याने अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनमोहन सिंग यांना एम्सच्या ह्रदय-मज्जाविज्ञान (कार्डिओन्युरो) विभागात दाखल करण्यात आलं आहे. अनेक वर्षांपासून सिंग यांचे फिजिशियन असलेले डॉक्टर नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील ह्रदयरोगतज्ज्ञांचा एक चमू त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे. दरम्यान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *