अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर…

(bollywood)Nora Fatehi

बॉलिवूड(bollywood)मधील प्रसिद्ध नृत्यांगणा

Advertisement
आणि अभिनेत्री नोरा फतेहीला ईडी म्हणजेच, अंमलबजावणी संचलनालयानं नोटीस बजावली आहे. त्यात नोराला दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.  सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंतर आता नोरा फतेहीला ईडीनं नोटीस बजावली आहे. आज नोरा चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री नोरा फतेही दिल्लीच्या ईडी कार्यालयात पोहचली आहे. तिहारमधील सुकेश रंजन प्रकरणात नोराला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच प्रकरणात उद्या (शुक्रवारी) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

“शरद पवार मोठे नेते, मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात”

नोरा फतेही ED कार्यालयात दाखल 

नोरा फतेही(bollywood)ला तिहारमधील सुकेश रंजन प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच प्रकरणी ईडी नोराची चौकशी करणार आहे. यापूर्वी ईडीकडून चौकशीसाठी जॅकलीन फर्नांडिसला बोलवण्यात आलं होतं. असं सांगण्यात येत आहे की, सुकेश रंजनकडून जॅकलीनलाही फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळेच तिलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. 

आज नोराची चौकशी केली जा आहे. अशातच याव्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिसलाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. जॅकलीन फर्नांडिसला चौकशीसाठी उद्या उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. नोरा आणि जॅकलीनकडे PMLA अॅक्ट अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. 

भारतात आली ट्रायटनची इव्ही मॉडेल एच…

काय आहे प्रकरण? 

या प्रकरणाबाबत बोलायचं झालं तर 200 कोटींच्या खंडणीपासून या प्रकरणाची सुरुवात झाली होती. तिहार जेलमध्ये बसलेल्या सुकेश चंद्रशेखर यानं एका उद्योजकाच्या पत्नीकडून ही रक्कम वसूल केली होती. त्यानंतर या प्रकरणी सुकेशची पत्नी लीना पॉलचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. ईडीनं त्यांचीही चौकशी केली होती.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *