Share Market मध्ये आजही तेजी कायम…

(sgx nifty) share market

शेअर बाजारात बुधवारी पुन्हा जबरदस्त तेजी दिसून आली. निफ्टी 18150 च्या पलीकडे गेला आहे. निफ्टी(sgx nifty) आणि सेन्सेक्समध्येही मजबूत तेजी दिसून आली. मिडकॅपमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे 1.5 टक्के वाढ झाली. आजच्या व्यापारात ऑटो, मेटल आणि एनर्जी स्टॉक्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात अर्थात वाढीसह बंद झाले. निफ्टी ऑटो निर्देशांक (Nifty Auto Index) 3 टक्क्यांहून अधिक वाढला. त्याचप्रमाणे ऊर्जा, इन्फ्रा, आयटी आणि धातू निर्देशांक (Metal Index) सुमारे 1 टक्क्यांनी वाढले.

Advertisement

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने आज डेली फ्रेमवर बुलिश कँडल तयार करत 170 अंकांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टीला आता 18,250 आणि 18,500 च्या दिशेने जाण्यासाठी 18,050 च्या वर राहावे लागेल असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणतात. दुसरीकडे तळाशी 17947 -17850 या झोनमध्ये सपोर्ट दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

हिना खान चा कुल लूक सोशल मीडियावर व्हायरल…

आजचा दिवस शेअर बाजारासाठी कसा असेल ?

शॉर्ट टर्म चार्ट फॉर्मेशन आजही तेजीचे संकेत दिसत आहेत. पण बुधवारच्या जोरदार इंट्राडे रॅलीनंतर निफ्टी 18,250(sgx nifty) -18,275 च्या आसपास थांबू शकतो असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. डे ट्रे़डर्सना 18,100 वर सपोर्ट दिसत असल्याचे ते म्हणाले. निफ्टी त्यावर गेल्यास 18,200-18,275 च्या लेव्हलवर जाऊ शकतो. दुसरीकडे निफ्टी 18,100 च्या खाली घसरला तर 18,040-17,980 च्या लेव्हलवर येऊ शकतो असेही चौहान म्हणाले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

आयटीसी (ITC )

पॉवरग्रीड (POWERGRID)

टाटा पॉवर (TATAPOWER)

भारत हेवी इलेक्ट्रीकल्स (BHEL)

फेडरल बँक (FEDERALBNK )

अशोक लेलँड (ASHOKLEY )

झील (ZEEL)

रायगडसह 13 किल्ले, गडकोट दत्तक घेणार…

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *