शिवसेनेचा उद्या ऐतिहासिक दसरा मेळावा…

महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेला शिवसेनेचा(sanjay raut)

Advertisement
ऐतिहासिक दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दशकांपूर्वी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली अखंडपणे सुरू आहे. कोरोना संकट अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करीत यंदाचा दसरा मेळावा उत्साहात होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

दसरा मेळाव्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शिवतीर्थावर येत असतात. शिस्तीने, गुलाल उधळत शिवसैनिकांचे जथेच्या जथे शिवतीर्थावर पोहोचतात. कोरोना संकटामुळे सर्वांच्या सुरक्षेसाठी त्यावर थोडी मर्यादा आली आहे. यंदा सलग दुसऱया दिवशी बंद सभागृहात मेळावा होत आहे. मात्र शिवसैनिकांमध्ये तोच जोष, तोच उत्साह आजही कायम आहे. कोरोना नियमावलीच्या शिस्तीचे पालन करून 50 टक्के शिवसैनिकांच्या उपस्थितीत यंदाचा मेळावा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन सोशल मीडियावरून लाईव्ह

षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 6 वाजता दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. कोरोना नियमावलीचे त्यात काटेकोर पालन केले जाणार आहे. सभागृहात फक्त 50 टक्के उपस्थिती असणार आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते, खासदार, आमदार आणि संपर्कप्रमुख असे मोजके पदाधिकारीच सभागृहात असणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विशेषतः मुंबई आणि ठाणे येथीलच पदाधिकाऱयांना मेळाव्यासाठी बोलवण्यात आले आहे. इतर सर्वांना उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शनपर भाषण घरी राहूनही पाहता येणार आहे. वृत्तवाहिन्या आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून त्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *