पती-पत्नीत भांडणं होण्याची ही आहेत कारणं….

toxic relationship

कोणतंही नात भांडणाशिवाय टिकत नसतं. जिथे प्रेम आहे तिथे भांडणं सुद्धा होत असतात. पण एका मर्यादेपेक्षा जास्त वादाला तोंड फुटत गेलं की, पती पत्नीत (toxic relationship) भांडणं होतात. तसंच नातं तुटण्याची वेळ सुद्धा येऊ शकते.अनेकदा नात्यातील समस्या भांडणाचं कारण ठरतात. रागाच्याभरात अपशब्द उच्चारल्याने एकमेकांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असते.

Advertisement

राज्यात पुढचे दोन दिवस पुन्हा अलर्ट….

पत्नीला वेळ न देता फ्रेंड्ससोबत वेळ घालवणं

काहींना आपल्या पार्टनरला वेळ द्यायला फारसं आवडत नाही. त्यामुळेच वादाला तोंड फुटतं असतं. यासाठी पती पत्नींनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ,ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

आईच्या हाताचं जेवणं

भारतातील जास्तीत जास्त जोडप्याची भांडणं आईच्या आणि बायकोच्या जेवणाच्या चवीची तुलना केल्यामुळे होतात. यामुळे बायकोला दोन शब्द ऐकवले जातात. काही स्त्रियांना या गोष्टीचा प्रचंड राग येतो. मग वादाला तोंड फुटतं.

कोल्हापुरात निवडणुकांचे रणशिंग फुंकले…उद्धव ठाकरे बायकोच्या नावाने घोटाळे करतात

बदलती जीवनशैली

सोशल मिडियाच्या अति वापरामुळे नातेसंबंधात (toxic relationship) दुरावा निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. त्यामुळे पती- पत्नीत भांडणं होतात.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *