BSNL ने स्वस्त केले ३ नवीन प्रीपेड प्लान…

prepaid plans

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) ने आपल्या तीन प्रीपेड प्लानच्या किंमतीत कपात केली आहे. ज्या प्लानची (prepaid plans) किंमत बदलली आहे. त्यात ५६ रुपये, ५७ रुपये, आणि ५८ रुपयाचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सचा समावेश आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच किंमत कमी केली असली तरी बेनिफिट्स मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. जाणून घ्या नवीन किंमत आणि बेनिफिट्स मध्ये काय काय मिळणार आहे.

Advertisement

इचलकरंजीतील त्या खून प्रकरणाचा लागला छडा….

कंपनीने ५६ रुपयाचा स्पेशल टॅरिफ व्हाउचरच्या किंमतीत २ रुपये कपात करण्यात आली आहे. या स्पेशल टॅरिफ पॅक मध्ये ग्राहकांना ८ दिवसाची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच ग्राहकांना कॉलिंगसाठी ५६०० सेकंद दिले जाते. कंपनीच्या ५७ रुपयाच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरच्या किंमतीत १ रुपयाची कपात करण्यात आली आहे.

रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या नियमयानंतर आता हे व्हाउचर ५६ रुपयाचे झाले आहे. यासोबतच ग्राहकांना १० जीबीचा डेटा आणि Zing Entertainment music चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या स्पेशल टॅरिफ पॅकमध्ये ग्राहकांना १० दिवसाची वैधता देण्यात आली आहे.

विरुष्काच्या नात्यात दुरावा!

बीएसएनएलने ५८ रुपयाच्या प्लानमध्ये (prepaid plans) फक्त १ रुपयाची कपात केली आहे. आता हा ५७ रुपयाचा स्पेशल टॅरिफ पॅक बनला आहे. या पॅक सोबत युजर्संना प्रीपेड इंटरनॅशनल रोमिंग पॅकला अॅक्टिवेट किंवा एक्सटेंड करण्याची सुविधा मिळते. या पॅकची वैधता ३० दिवसाची आहे. Keralatelecom च्या रिपोर्टनुसार, हा बदल सध्या केरळ सर्कलच्या युजर्संसाठी लागू करण्यात आला आहे. प्रीपेड प्लानची नवीन किंमत १८ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होणार आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *