मुलाखतीदरम्यान Hardik Pandya ला चिमुकल्या Agastya कडून मिळाली सरप्राईज भेट

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 

Advertisement
हार्दिक पंड्या(Hardik Pandya)अप्रतिम कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी, पांड्याने दिलेल्या मुलाखतीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधील एक व्हिडिओ सध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. मुलाखतीदरम्यान पांड्याला त्याच्या चिमुकल्या मुलाकडून म्हणजेच अगस्त्यकडून सरप्राईज भेट मिळाली आहे. बीसीसीआयने पिता-पुत्राच्या भेटीचा गोड व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

Redmi Note 10S स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर

 


‘एक सुंदर क्षण, जेव्हा पापा हार्दिक पांड्याच्या मुलाखतीदरम्यान सरप्राईज एंट्री झाली.’ अशी छानशी कॅप्शनदेखील बीसीसीआयने या व्हिडिओला दिली आहे.व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पांड्या मुलाखत देण्याच्या तयारीत असतो. दरम्यान, त्या स्टुडिओत अचानक चिमुकल्या पावलांचा एंट्री होते. आणि तो आपल्या वडिलांना सरप्राईज भेट देतो.पापा म्हणत अगस्त्य पांड्याकडे धाव घेतो. अगस्त्यला पाहून पांड्यादेखील खूश होतो. पण, मुलाखत सुरु आहे हे लक्षात येताच, मी पूर्ण केल्यानंतर भेटू शकतो का? अशी विचारणा करतो.

 

अभिनेत्रीच्या निधनानं कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर…

 


भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविच हिने 30 जुलैला अगस्त्यला जन्म दिला होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (सोमवारी) वॉर्म अप मॅच होणार आहे. या मॅचमध्ये हार्दिक कसा खेळ खेळतो, विशेषत: बॉलिंग करतो का? याकडं टीम मॅनेजमेंटचं लक्ष असेल. या मॅचमध्ये तो यशस्वी झाला नाही तर पाकिस्तान विरुद्ध शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी मिळू शकते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *