नांदगावमध्ये बिबट्याची दहशत, वनअधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी

कराड येथील नांदगावमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून बिबट्याचे

Advertisement
(leoperd) दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या फक्त शिवारातच नव्हे तर लोकांच्या दारात मुक्तसंचार करु लागला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना तक्रार केली असता शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली. बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करीत ग्रामस्थांना सूचना केल्या. सुळागिरीच्या कुशीत वसलेल्या नांदगाव येथे 6 ऑक्टोंबर रोजी बिबट्याने शेळी व बोकड या वर हल्ला करीत त्यांना ठार केले. लोकवस्ती असणाऱ्या भागात झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने घटनेचा पंचनामा केला. पण त्यानंतर हा बिबट्या दररोज ग्रामस्थांना कोणत्या ना कोणत्या ठिकाणी दर्शन देत आहे. त्यामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. तर लोकवस्तीत रात्रीचा बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थ सायंकाळपासूनच घराची दारे बंद करून घेत आहेत.

भारतात दुसरी लाट अजून संपली नाही, भारती पवार यांचं मत

या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री वनरक्षक (Forester) अरुण सोळंकी, वनपाल आनंदा सवाखंडे, धनाजी गावडे यांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी केली. कुंभार वाडा येथील बाग नावाच्या शिवारातून बिबट्या येत असल्याने तेथे जाऊन पायांचे ठसे पाहिले. बिबट्यापासून कसे सावध राहायचे यासाठी ग्रामस्थांना सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुंभार. हितेश सूर्वे, रघुनाथ जाधव, सचिन कुंभार, विलास कुंभार, रोहन पाटील, सौरभ पाटील, अण्णा शेटके, निलेश कुंभार, गणपत पवार आदींची उपस्थित होती.

पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 122 रुग्णांना डिस्चार्ज

रविवारी रात्रीही बिबट्याचे दर्शन

रविवारी रात्री आठच्या सुमारास नांदगाव पोलीस औटपोस्टच्या पाठीमागच्या बाजूला रस्ता पार करीत उसाच्या शेतात जाताना ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिले .त्यामुळे बिबट्याच्या धास्तीने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *