जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप ; पदक विजेते होणार मालामाल

सर्बिया येथे 24 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक बॉक्सिंग

Advertisement
(boxing) चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा 13 सदस्यीय चमूही सज्ज झालाय. दीपक कुमार, शिव थापा व संजीत या हिंदुस्थानच्या बॉक्सर्सवर साऱयांच्या नजरा असणार आहेत. या स्पर्धेतील लढती पाहण्यासाठी बॉक्सिंगप्रेमींनाही स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे.

राज्याच्या औद्योगिक धोरणात बदल करणार – शरद पवार

2.6 मिलियन डॉलर्सची पारितोषिके

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच पारितोषिक दिली जाणार आहेत. यावेळी 2.6 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम बक्षिसासाठी वापरण्यात येणार आहे. सुवर्ण पदक पटकावणाऱया खेळाडूला एक लाख डॉलर्स प्रदान करण्यात येईल. रौप्य पदक जिंकणारा खेळाडू 50 हजार डॉलर्सचा धनी होईल. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणाऱया दोन खेळाडूंना प्रत्येकी 25 हजार डॉलर्स देण्यात येणार आहेत.

बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे वेळापत्रक

 • 24 ऑक्टोबर  उद्घाटन सोहळा
 • 25 ऑक्टोबर ते नोव्हेंबर  प्राथमिक फेरी
 • नोव्हेंबर  विश्रांती दिवस
 • नोव्हेंबर  उपांत्य फेरीच्या लढती
 • 5, 6 नोव्हेंबर  अंतिम फेरीच्या लढती

भारताच्या ओएनजीसीने गॅस शोधला, मात्र इराणने कंत्राट दिले तिसऱ्यालाच…

हिंदुस्थानचा संघ खालीलप्रमाणे

 • गोविंद (48 किलो)
 • आकाश (54 किलो)
 • दीपक (51 किलो)
 • रोहित (57 किलो)
 • वरिंदर (60 किलो)
 • शिवा (63.5 किलो)
 • निशांत (71 किलो)
 • आकाश (67 किलो)
 • सुमित (75 किलो)
 • सचिन (80 किलो)
 • संजीत (92 किलो)
 • लक्ष्य (86 किलो)
 • नरेंदर (92 पेक्षा जास्त किलो)
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *