इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी, अखेर तो दिवस उजाडला…

ichallakaranji

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाने वाढत्या रुग्णांची संख्येने (patient) हाहाकार माजविला. सध्या देशभरासह राज्यात रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेल्या इचलकरंजी शहरात सुध्दा गेल्या काही दिवसात रूग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.

तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, प्रवाशांनी केली तरुणाची धुलाई पाहा video

शहरवासियांसाठी मोठा दिलासादायक ठरला. या दिवशी एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. त्याचबरोबर विशेष म्हणजे उपचार घेणारे दोन रुग्णही बरे होऊन घरी गेल्याने इचलकरंजी शहर दुसऱ्यांदा कोरोनामुक्त झाले.इचलकरंजीत आजअखेर कोरोनाची रूग्ण संख्या (patient) ९ हजार ५८४ इतकी झाली. तर कोरोनावर मात करून घरी गेलेल्यांची संख्या ९ हजार १८१ इतकी आहे. तर कोरोनामुळे आजअखेर ४०३ जणांना मृत्यू झाला. सोमवार दि. १८ ऑक्टोबर रोजी मात्र एकाही नव्या रुग्णाची भर पडली नाही.

ड्रग्ज, गांजाची बाजू कोण घेतं, जनतेला माहिती आहे प्रवीण दरेकर

तर उपचार घेणारे दोन रूग्णही बरे होऊन घरी परतल्याने शहर कोरोनामुक्त झाले. शहर भविष्यात कोरोनामुक्त रहाण्यासाठी नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लसीकरणालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *