सेन्सेक्स फार्मात!…

share market(sensex now)

शेअर बाजारात(sensex now) गेल्या काही दिवसांपासून तेजी पहायला मिळत आहे. काल सेन्सेक्सने 61,800 चा टप्पा गाठला होता. तर आज त्यापुढे जात आता 62 हजारांचा टप्पा पार केला आहे. सेन्सेक्स सध्या 62,111.64 वर आहे. तब्बल 346.05 अंशांची उसळी सेन्सेक्सने मारली आहे. दसऱ्याच्या नंतर आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही तेजी पहायला मिळत आहे.

केसांना तेलाशिवाय मॉइश्चराइझ करण्यासाठी…

काल सोमवारी सलग सातव्या सत्रात शेअर बाजारात तेजी कायम राहिली होती. निफ्टी 50 ने 18,500 ची पातळी ओलांडली होती आणि सेन्सेक्सने पहिल्यांदाच 62,000 ची पातळी गाठली होती. जागतिक इक्विटी मार्केटमधील घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमती 85 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त असूनही, देशातील इक्विटी मार्केट तेजीत आहे. बीएसई सेन्सेक्सने 61,963.07 चा नवा उच्चांक बनवला आणि 459.64 अंकांनी वाढून 61,765.59 वर बंद झाला होता. निफ्टी 50 138.50 अंकांनी वाढून 18,477 वर बंद झाला होता.

क्रेडीट कार्डवर मिळणार ‘हे’ फायदे…

गुंतवणूकदारांचा तंत्रज्ञान शेअर्समध्ये(sensex now) रस कायम आहे. सोमवारी निफ्टी आयटी निर्देशांक 1.57 टक्क्यांनी वाढला. माइंडट्री आणि इन्फोसिससारख्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे रिझल्ट चांगले आहेत आणि मजबूत डॉलरमुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली आहे. निफ्टी मेटल इंडेक्स जवळपास 4 टक्क्यांनी वाढला आहे. बेस मेटल्स कित्येक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याने मेटल्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. हिंदुस्थान कॉपर, वेदांता आणि हिंदुस्तान झिंक मेटल्स या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. यामध्ये 12-13 टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय टाटा स्टील, हिंडाल्को आणि सेल सारख्या मेटल्सच्या शेअर्समध्ये 2-5 टक्के वाढ झाली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *