सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले; शिवप्रतिष्ठान संघटना आक्रमक

सांगली शहरामधील कॅफेमध्ये(cafes) अश्लिल चाळे होत असल्याचा आरोप करत आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विश्रामबाग 100 फुटी रोडवरील एका कॅफे शॉपमध्ये घुसन तोडफोड केली. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

सांगली शहरातील एका कॅफे(cafes) शॉपमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपुर्वी घडला होता. या घटनेनंतर कोणतीही कारवाई न झाल्याने शहरातील कॅफे शॉपमधील अश्लिल प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक झाली आहे. आज संघटनेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 100 फुटी रोडवर असलेले एकापाठोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आले.

शहरातील कॅफे शॉपमध्ये सर्रास अश्लिल चाळे करण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आला आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले.

“शहरातील कॅफेंमध्ये अश्लिल चाळे होत आहेत. तसेच अल्पवयीन मुलींचे शोषण होत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. यापुढेही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून अशा कॅफेंविरोधात धडक कारवाई करणार आहे,” असा इशारा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी शिवप्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यातही घेण्यात आले.

हेही वाचा :

संजयकाकांच्या दिलदार मित्राने चंद्रहार पाटलांचा बळी दिला!

रोहित शर्मा आज मुंबईसाठी खेळणार शेवटचा सामना? Video Viral

आजपासून 10 दिवस सिनेमागृह बंद, काय आहे कारण?