मविआच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव;थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी

महाराष्ट्र विधानसभा (Assembly)निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत 13 खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 16 जागा निवडून आणता आल्या. दरम्यान या पराभवामागे अनेक कारणे असून राजकीय विश्लेषकांनीही अनेक दावे-प्रतिदावे केलेत. मात्र या पराभवाचे कारण मविआ नेत्यांनी ईव्हीएम असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, याच मुद्यावरून महाविकास(Assembly) आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी नागपूर आणि मुंबई खंडपीठात दाखल याचिका होत आहे. यात विधासभा निवडणुकीवर आक्षेप घेत थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

काटोलचे पराभूत उमेदवार सालील देशमुख, हिंगण्याचे पराभूत उमेदवार रमेश बंग, जत विधानसभा मतदार संघातील विक्रम सावंत, पिंपळी चिंववडचे राहुल कलाटे, आकोटचे महेश गनगाने आणि बुलढाण्याच्या जयश्री शेळके या आज न्यायालयात आपली याचिका दाखल करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

दोन दिवसांआधी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीला आव्हान देण्यात आले होते. यात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत प्रफुल गुडधेसह यशोमती ठाकूर, सुभाष धोटे, गिरीश पांडव, राजेंद्र शिंगणे, शेखर शेंडे, संतोष सिंग रावत यांनी याचिका दाखल केली होती.

निवडणुकीत नियमाचे मोठ्याप्रमाणत उल्लघन झाले. तसेच ईव्हीएम छेडखानी झाली, मतदार याद्यात घोळ, व्हीव्हीपैड फेरमोजणीला प्रतिबंध यासह अनेक मुद्दे या याचिकेत मांडण्यात आले. दरम्यान आज याच मुद्याला पुढे नेत मविआच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ईव्हीएमला विरोधी करून बॅलेट पेपेरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की. शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे.

तसेच काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही केवळ बळीचे बकरे आम्हालाच करत आहात. म्हणून राज्यातील प्रस्थापितांना आपल्याला उधळून लावावे लागेल असेही ते म्हणले.

हेही वाचा :

‘अजितदादांनी असं बोलू नये’; छगन भुजबळ यांनी ‘त्या’ विधानावर दिला सल्ला

“धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्यामुळे गदारोळ, मुंडे समर्थक आक्रमक”

“दररोज २०० रूपयांची बचत, तुमच्या मुलांना बनवू शकते करोडपती”