मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी (mobile)मोठी बातमी समोर आली आहे. स्मार्टफोनच्या किमतीत अचानक वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे. जागतिक बाजारातील बदल, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि उत्पादन खर्चात वाढ या कारणांमुळे अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या फोनच्या किंमती वाढवल्या आहेत

.Apple ने आपल्या (mobile)प्रीमियम iPhone मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली असून नवीन शिपमेंटपासून ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच Samsung नेही काही Galaxy सिरीजच्या फोनचे दर वाढवले आहेत.चिनी स्मार्टफोन उत्पादकांमध्येही वाढ दिसून येत आहे.
Xiaomi आणि Realme यांनी (mobile)त्यांच्या बजेट आणि मिड-रेंज फोनच्या किमतीत वाढ केली आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत ही वाढ आणखी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर थोडा अधिक खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.