लोकसभा निवडणुकीच्या(political consulting firms) जाहीर प्रचाराची उद्या रविवारी सांगता होत असून, दिवसभर पदयात्रा, रॅली आणि सभांचा नुसता धडाका आहे. हातकणंगलेत महायुतीचे धैर्यशील माने, ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी यांनी इचलकरंजीतच पदयात्रा आणि सभा ठेवल्याने त्या दिवशी जत्रेचे स्वरूप येणार आहे.
कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीत(political consulting firms) सहभागी होणार असून, शाहू छत्रपती यांच्या वतीने कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रभागात पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे समजते. गेले पंधरा-वीस दिवस प्रचाराचा धडाका सुरू असून, त्याची सांगता रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे दुपारी तीन वाजता इलकरंजी येथील शिवतीर्थ येथून घोरपडे नाट्यगृहापर्यंत रॅली काढणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. त्यानंतर तेथील चौकात सभा होणार आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत कबनूर दर्गा येथून अण्णा भाऊ साठे मैदानापर्यंत रॅली व दोन वाजता तेथेच सभा घेतली जाणार आहे.
महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील-सरुडकर हे सकाळी अकरा वाजता पदयात्रा काढणार आहेत. वाळवा, शिरोळ, इचलकरंजी या ठिकाणी पदयात्रा काढावी असा आग्रह आहे. पण, तेही इचलकरंजीतच काढण्याची शक्यता आहे.
संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत राधानगरी व त्यानंतर सकाळी अकरा वाजता कोल्हापूर शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. शाहू छत्रपती यांचे नियोजन अद्याप झाले नसले तरी कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रभागातून रॅली काढली जाणार असल्याचे समजते.
हेही वाचा :
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर काढले?, Video Viral
प्रियांका चोप्रा हिच्या नवऱ्याची प्रकृती चिंताजनक, व्हिडीओ व्हायरल
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश