“टीम इंडियाच्या गोलंदाजीला धक्का! वेगवान बॉलिंग स्टारचा क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय”

भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून(cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला आरोन आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक आव्हानांचा सामना करीत आला, ज्यामध्ये दुखापतीचा प्रभाव मोठा होता.

आरोनने आपल्या करिअरची सुरुवात भारतीय संघाशी केली, आणि २०११ मध्ये वेस्टइंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पणही केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने तीन गडी बाद केले होते. त्याने १८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात २९ गडी बाद केले आहेत. त्याच्या ताशी १५३ किमी/तास गतीने चेंडू टाकण्याची शैली क्रिकेटमध्ये(cricket)लक्षवेधी ठरली होती.

२०११-१२ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ताशी १५३ किमी गतीने गोलंदाजी केली होती, ज्याने त्याच्या गोलंदाजीच्या कारकिर्दीला वेगळी ओळख दिली. पण दुखापतींमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अडचणी आल्या. आरोनने आपल्या आयपीएल कारकिर्दीमध्ये ५२ सामन्यांमध्ये ४४ गडी बाद केले आहेत, परंतु त्याला भारतीय संघाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही.

आरोनने आपल्या निवृत्तीबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट करत, “गेल्या २० वर्षांपासून मी वेगवान गोलंदाज म्हणून जगलो. आज मी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करतो. मी देव, कुटुंब, मित्र, सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो. अनेक दुखापतींमुळे मी क्रिकेटमधून बाहेर पडलो, परंतु माझ्या करिअरने मला खूप काही दिलं,” असे सांगितले.

वरुण आरोनच्या क्रिकेट कारकिर्दीला दुखापतींनी धक्का दिला असला तरी, त्याच्या वेगवान गोलंदाजीने त्याला एक महत्त्वपूर्ण स्थान दिलं आणि त्याने क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

हेही वाचा :

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता, राहणार १५०० रुपयांपासून वंचित

तरुणाने झोपेत AI च्या मदतीने 1000 नोकऱ्यांसाठी केलं Apply

 ‘गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीला गुन्हेगारीची राजधानी बनवले’; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोल