इचलकरंजीतील राकेश कांबळे खूनप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल!

इचलकरंजी येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून सुमारे बाराजणांनी केलेल्या सशस्त्र(people) हल्ल्यात तरुणाचा खून झाला. राकेश धर्मा कांबळे (३२ रा. गणेशनगर) असे या तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी सुरज आनंदा कौंदाडे, ओंकार दत्तात्रय खोत, संदेश उर्फ स्वप्निल बाजीराव जाधव, ऋषिकेश श्रीकांत साळुंखे, प्रतीक दीपक खोत, राकेश रामा कोरवी यांच्यासह अन्य ८ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी रात्री घडली.पंचगंगा कारखाना परिसरातील एका चायनीज गाडीवर(people) राकेश याचे संबंधित रोहन भोसले, वैभव मिरजे, प्रशांत, अमन आदी खाद्यपदार्थ खात बसले होते. त्यांच्यामध्ये शिवीगाळसह चेष्टामस्करी सुरु होती. त्याचवेळी तेथून संशयित सुरज व त्याचा मित्र निघाले होते. शिवीगाळ आपल्याला पाहून केल्याच्या समजातून संशयितांनी जाब विचारला. त्यातून वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.दोन्हीकडील अन्य काहीजण घटनास्थळी दाखल होऊ लागले.

त्यातच राकेश याचाही समावेश होता. तो हल्लेखोरांच्या ताब्यात सापडल्याने मारहाण झाली. राकेशने पलायन केले. त्याचा पाठलाग करून टोळक्याने शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :

कोल्हापुरात, तारेवरची नव्हे चक्क रस्त्यावरची कसरत!

क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK आणि RCB दोघंही जाऊ शकतात प्लेऑफमध्ये

धनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair