कोरोनापेक्षाही धोकादायक आजार; शरीराचा ‘हा’ भाग करतोय खराब

मागील काही वर्षात कोरोनाने(Corona) अवघ्या जगभरात कहर केला होता. त्यानंतर मंकीपॉक्स या आजाराने देशात थैमान घातल आहे. मात्र आता मंकीपॉक्सची वाढती रुग्णसंख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे.अशातच आता डेंग्यू आजार झपाट्याने पसरत आहे.

हा आजार अतिशय जीवघेणा आहे, त्यामुळे थोडा जरी निष्काळजीपणा केल्यास रुग्णाचा थेट मृत्यू होऊ शकतो, परंतु आता या तापाचे दीर्घकालीन परिणाम दिसून येत असून हा कोरोनापेक्षाही(Corona) घातक असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

डेंग्यू हा आजार डास चावल्यामुळे होतो. ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स देखील कमी होऊ लागतात, यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. मात्र योग्य उपचार केल्यास याचा रुग्ण डेंग्यूतून बारा देखील होतो, परंतु त्याचा प्रभाव त्या रुग्णावर प्रदीर्घ काळ राहतो, कारण डेंग्यू तापामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त प्रमाणात वाढतो असे एका संशोधनातून समोर आले आहे.

याशिवाय सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे दिसून आले आहे की, डेंग्यू आजाराच्या रुग्णांना कोरोना आजाराच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका हा 55 टक्के जास्त आहे. तसेच जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 11,700 हून अधिक डेंग्यू रुग्ण आणि 12 लाखांहून अधिक कोविड-19 रुग्णांच्या चाचणी आणि वैद्यकीय डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामधून ही गोष्ट निदर्शनास आली आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, डेंग्यू आजारात ताप जास्त प्रमाणात येतो. ज्यामुळे रक्तस्त्राव आणि प्लेटलेटची संख्या कमी होते आणि अवयव खराब होण्याचा धोका देखील जास्त वाढतो. ज्यामुळे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका तर वाढतोच, याशिवाय न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा धोका तब्बल 213 टक्क्यांनी वाढत आहे.

त्यामुळे डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे जो संक्रमित डासाच्या चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरतो, त्यामुळे या आजारापासून वेळीच काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा:

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मेगा प्लॅनिंग

भाजपने ‘या’ 4 नेत्यांवर टाकली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी!

ऐन गणेशोत्सवात मिरवणुकीत ‘डीजे’वर घालण्यात आली बंदी; तरी डीजे लावला तर…