सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज(Video) व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी रडवतात तर कधी थक्क करून जातात. आताही इथे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका थरारक घटनेतील दृश्य दिसून आले. अथांग समुद्र जितका मनाला सुखद उभारी देऊन जातो तितकाच तो आपल्या जीवासाठी धोकादायक देखील ठरू शकतो. समुद्राच्या लाटा कधी कोणते वळण घेतील ते सांगता येत नाही अशात समुद्राच्या पाण्यात जाणे आपल्यासाठी धोक्याचे ठरू शकते.

सध्याच्या व्हायरल व्हिडिओत(Video) असेच काहीसे दृश्य दिसून आले ज्यात एक भलीमोठी बोट क्षणात पाण्यात पलटी झाल्याचे दिसून आले. समुद्रातील हा अपघात आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. घटनेतील दृश्य इतके भयाण आहेत की ते पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, तुम्हाला एक अथांग समुद्र दिसेल. या समुद्रात एक लहान उभी ट आहे. इथपर्यंत सर्व सुरळीत सुरु असते मात्र तितक्यात समोरून एक खवळलेली लाट येते आणि क्षणातच बोटीवर जोरदार आढळते. यामुळे बोट पलटी होते आणि पाण्यात विलीन होऊन जाते.
यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी त्या बोटीवर काही व्यक्ती उपस्थित असतात ज्यामुळे या घटनेत त्यांच्यासोबत बरेवाईट होण्याचा धोका स्पष्ट दिसून येत आहे. आता यात पुढे काय घडलं ते सांगण्यात आले नाही पण याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून लोक हैराण झाले असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ @zhenya__05 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आता चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे आणि ही घटना कधीची आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान गेल्या काही काळात सोशल मीडियावर अशा अनेक थरार घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यांनी लोकांना अचंबित केले आहे.
हेही वाचा :
काळजी घ्या २ दिवस उष्णतेचा इशारा राज्यभरात IMD कडून अलर्ट
माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट
सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;