मार्की येथे वीज पडून बैल जोडीचा दुर्दैवी मृत्य झाला

गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय. याचा फटका शेतकऱ्यांना (farmers) बसत आहे . यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मार्की (बु.) येथील श्री.दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दिवाकर यांचे शेत शिवारात आहे. अचानक ढग काळवंडून आल्याने पावसाच्या दृष्टीने झाडाचा आसरा घेण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली त्यांनीं आपली बैलजोडी बांधून ठेवली. अशातच सोसाट्याच्या वाऱ्याने रौद्ररूप धारण केले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. झाडाखाली बांधून असलेल्या बैलावर अचानक वीज पडली आणि या बैलजोडीचा जागेवरच मृत्यू झाला .सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे.अश्यातच बैल जोडी गेल्याने दिवाकर यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जिवापाड प्रेम असणारी ही बैलाची जोडी मृत्यमुखी पडल्याने त्यांना शोक अनावर झाला आहे .

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे असणार आहेत. हवामान विभागाने मध्य विदर्भाला अवकाळीसह गारपिटीचा आणि उर्वरित भागात अवकाळी पावसासाठी पिवळा आणि नारंगी इशारा दिला आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या (farmers) संकटात आणखीनच भर पडली आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरसह इचलकरंजीला शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले!

चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?